Valentine
तुझ्या दिठीला दिठी भेटता; प्रीत कोवळी मनी उमलली
मनी तुझ्या ती प्रीत रुजविण्या; गुलाब गंधित मृदू मखमली
सुगंध उरी तू भरून घेता; हळूच लालिमा उतरे गाली
साथ हवी जन्मोजन्मीची, प्रस्तावरुपी पृच्छा मी केली
मनी वसे होकार जरी; तू करवून घेशी मनधरणी
सखा चॉकलेट मदतीस येइ; मनी तुझ्या शर्करा पेरुनी
नाजूक क्षणी या धावून येइ, दुजा मित्र तो अस्वल टेडी
मिठी मनीची हळवी माझ्या, अलगद तुझिया मिठीत सोडी
गुलाब गंधित, मधुर शर्करा, जरी बाहुली स्पर्श मखमली
मिठीत माझ्या हळूच येऊनी, प्रीत मनीची तुझी लाजली
दिठीत उमलून प्रीत पोचते, मिठीत अपुल्या मुक्कामी
अधर सांगती अधरांना की तू माझी अन् तुझाच मी
गुपीत मनीचे समजूत अपुली; दुनिया अवघी जाणून होती
प्रीत उमगली एक दुजाला, अपुल्यासंगे दुनिया हसली
--- मनिष मोहिले