लव्हींग व्हिन्सेंट
आधुनिक चित्रकलेचा जनक मानल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध व्हिन्सेंट वॅन गॉग नी आपल्या अवघ्या सदतीस वर्षाच्या आयुष्यात, सुरूवातीला अनेक क्षेत्रात अपयशी ठरल्यावर; फक्त शेवटच्या आठ वर्षात चित्रकलेला सुरूवात करून संशयास्पद आत्महत्यास्वरूप मृत्यूपर्यंत, तैलरंग वापरून जवळपास ८०० चित्र काढली जी तो जिवंत असताना कधीही लोकांपर्यंत विक्रीसाठी पोचली नाहीत
आणि तरीही आज जागतिक चित्रकलेच्या इतिहासाचा आणि चित्रकारांचा अभ्यास करताना वॅन गॉग चं नाव एक दिग्गज कलावंत म्हणून अग्रक्रमी येतं.
तैलरंगात ब्रश बुडवून त्याचे छोटे मोठे फटकारे कॅनव्हास वर मारत योग्य तो अंतिम अपेक्षित परिणाम साधत निसर्गचित्र, व्यक्तिचित्र बनवणाऱ्या वॅन गॉग नी एका नवीन चित्रशैलीचा शोध लावत स्वत:चं नाव आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्रात अजरामर करणाऱ्या तैलचित्रांची निर्मीती केली.
अशा या जगप्रसिद्ध मनस्वी कलावंताच्या हातची काही पत्रं जी त्यानी आपल्या भावाला, थिओला लिहीली होती आणि जी थिओ च्या हाती पडण्याआधीच थिओ देखील मरण पावला त्या पत्रांचा थिओच्या विधवा पत्नी पर्यंतचा प्रवास या विषयावरचा एक आगळा चित्रपट म्हणजे Loving Vincent - पत्राच्या शेवटी Vincent Van Gogh नी Your Loving Vkncent अशी जी स्वाक्षरी केलीये त्या स्वाक्षरीला शीर्षक बनवलेला हा ॲनिमेशन चित्रपट.
या ॲनिमेशन चित्रपटाची खासियत म्हणजे हा नेहमीचं ॲनिमेशन तंत्र वापरून बनवलेला चित्रपट नाही. तर या साठी जगभरातून १२५ चित्रकारांकडून वॅन गॉग च्याच शैलीत तैलचित्रण करून घेऊन एक एक फ्रेम तयार केली गेली आणि चित्रपट बनवला गेला. संपादनाबाबत बोलायचं तर तब्बल ६५००० फ्रेम्स मधून फक्त १००० फ्रेम्स निवडल्या गेल्या.
तैलचित्र आणि चित्रपट निर्मिती या दोन कलाक्षेत्रांचा संगम घडवून वॅन गॉग वर चित्रपट बनवला जाणं ही वॅन गॉगचा , त्याच्या शैलीचा आणि एकूणच कलेचा यथार्थ गौरव करणारी आदरांजली आहे असं म्हणावं लागेल.
चित्रपट अजून अहमदाबादला प्रदर्शित झाला नाही आणि त्यामुळे मी तो अजून पाहिलेला नाही. त्यामुळे हे चित्रपट परीक्षण नाही.
पण अशा पद्धतीने चित्रपट निर्मिती करणं हा निश्चितच कलेच्या क्षेत्रातील एक कौतुकास्पद प्रयत्न आहे. ही कल्पनाच फार सुरेख आहे.
नक्की बघायच्या चित्रपटांच्या लांबत चाललेल्या माझ्या यादीत नुकताच समाविष्ट झालेला हा चित्रपट - *Loving Vincent*
-- मनिष मोहिले
(तळटीप - व्यावसायिक छायाचित्रण करणाऱ्या माझ्या शाळा मित्र राजेश जोशी अहमदाबादला माझ्या घरी आला असताना गप्पांमध्ये त्याच्याकडून लव्हींग व्हिन्सेंट बद्दल पहिल्यांदा ऐकलं).

No comments:
Post a Comment