Sunday, February 7, 2016

वियोग

वियोग

करूनी जरी शकले दिलाची
गेला तुझा वियोग होता
दर्पणी माझ्या मनीच्या
मुखडा तुझा अभंग होता

बोचरा जरी काट्याप्रमाणे
सखये तुझा वियोग होता
माझिया श्वासात आठव
सुगंधी तुझा दरवळत होता

साथीची जरी तार तुटली
सखये तुझा वियोग घडता
आपुल्या प्रीतिगीतांचा
सूर मनी अबाधित होता

अश्रूंनी जरी भरले नेत्र
सखये तुझा वियोग घडता
जगतासमोरी माझा परि
मुखडा सखे हसराच होता

------ © मनिष मोहिले

No comments:

Post a Comment