Sunday, October 22, 2023

वृंदावन

तुझ्या लोचनांशी दिठी भेट होता, रोम रोमातूनी प्रीत झंकारली

हळू साद येता मुखातून तुझिया, तुझी राधिका मुग्ध नादावली


चंद्र केशरी पूर्ण गगनी उगवता, धरा शुभ्र वसने तनी ल्यायली

शशी नी क्षमेची चांदणी प्रीत फुलता, रासलीला आपुल्या मनी रंगली


सुखे गोफ धरता, सुखे संग गाता, कालिंदी जन्म सरिता सुखे वाहिली

युगायुगातीत असे मैत्र जुळता, वृंदावनेच जणू मनी साकारली


---- मनीष मोहिले







No comments:

Post a Comment