Wednesday, March 23, 2016

प्रणय

धुंदावलेल्या प्रणयरम्य रात्री
स्पर्शसंगीताचे धुंद सूर आळवावे

तुझ्या पापणीतील अलवार तृप्ती
पुन्हा प्राशूनी मी अतृप्त व्हावे

असे धुंद व्हावे चराचर हे सारे
लक्ष तारकांनी व्योम रोमांचित व्हावे

आणि पहाटे पारिजातकाने
फुलांच्या सड्याने बहरून यावे

------ मनिष मोहिले 

No comments:

Post a Comment