Wednesday, March 23, 2016

प्रीतरंग

मी रंग कसा रे खेळू कान्हा
पुसते राधा कृष्णाला
भरले सारे तुजपाशीच रे
माझ्या पाशी ना उरला

निळा रंग तव देहाचा नी
पितांबराचा हा पिवळा
कुंकुम लाल तिलक भाळी
अन् केसरिया तव शेल्याचा

माथ्यावरचे मोरपीस ते
गृह च असे साऱ्या रंगा
मी रंग कसा रे खेळू कान्हा
पुसते राधा कृष्णाला

तू राधा नी मी कृष्ण असे
की जशी सावली देहाला
रंग सर्व हे तुझेच राधे
तव प्रीतरंगी मी रंगलेला

ऐकून उत्तर कृष्णाचे
लाजली लाल गाली राधा
उरली गरज ना रंगांची नी
श्यामरंगी रंगली राधा

-------- मनिष मोहिले 

No comments:

Post a Comment