आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो
खर्डेतल्या एका सदस्याचं हे व्हॉट्सॅप स्टेटस होतं.
आजकालच्या कुणालाही लागू होतील अशा या ओळी. त्यावरून काही ओळी मलाही सुचल्या. त्या खाली देत आहे. मात्र माझा एकंदरीत कल जे गेलं त्याचं गरजेपेक्षा जास्त दु:ख करत बसण्यापेक्षा येणाऱ्या उद्या वर लक्ष केंद्रीत करा असा आहे. म्हणून बाकी कविता जरी मूळ ओळींशी साधर्म्य असलेल्या स्वभावाची असली तरी शेवट मी माझ्या स्वभावानुसार / कलानुसार केला आहे.
आयुष्य
त्यागूनी मी मोह सारे यशापाठी धावलो
भोगण्या आनंद मी मग वेळ मागू लागलो
वाटले मजला अखेरी मुक्कामी मी पोचलो
हरवले वाटेत जे मी साथी शोधू लागलो
पुस्तकातील पिंपळाचे पान पाहू लागलो
शोधताना नक्षी मी जाळीत अडकू लागलो
परतूनी मी पुस्तकात मोरपीस ठेवले
स्पर्शूनी त्या मी फिरुनी मोहराया लागलो
------ मनिष मोहिले

No comments:
Post a Comment