ह्या गुणगुणताना ओळी, तू शोध मला तुजपाशी
तू पूस तुझ्या ओठांना, मी जेथे दडलो आहे
वरील काव्यपंक्तींवरून सुचलेल्या ओळी
शोध
वेचताना बकुळफुले ही, तू शोध मला तुजपाशी
तू पूस तुझ्या श्वासांना, मी तिथेच दडलो आहे
माळताना कुंतली गजरा, तू शोध मला तुजपाशी
तू पूस चुकार बटांना, मी तिथेच दडलो आहे
बघताना इंद्रधनुष हे, तू शोध मला तुजपाशी
तू पूस तुझ्या डोळ्यांना, मी तिथेच दडलो आहे
सांजेस दिवा करताना , तू शोध मला तुजपाशी
तू पूस तुझ्या आशेला, मी तिथेच दडलो आहे
मोजताना रात्रीस तारे, तू शोध मला तुजपाशी
तू पूस तुझ्या स्वप्नांना, मी तिथेच दडलो आहे

---- मनिष मोहिले
No comments:
Post a Comment