जगातील सात आश्चर्य आपणा सर्वाना माहिती आहेत. इजिप्तमधील गिझाचे पिरॅमिड, चीनमधील ग्रेट वॉल, जॉर्डनमधील पेट्रा, पेरु मधील माचू पिच्चू, रोममधील कलोसियम, युकातान मेक्सिकोमधील चिचेन इत्झा (मायन संस्कृती) रिओ मधील ख्राइस्ट द रेडीमर चा पुतळा आणि आपला आग्र्याचा ताजमहाल. ही सर्व मानवनिर्मित आश्चर्ये. फक्त मानव संस्कृतीचा विचार केला तर प्रचंड व अतर्क्य अशी विशेषणं चपखल बसतात.
पण अफाट, अगाध नी अमर्याद अशा निसर्गाचा व त्यातील आश्चर्यांचा आपण विचार केला तर त्या आश्चर्यांपुढे आपण केवळ नतमस्तक होतो. माऊंट एव्हरेस्ट, ग्रॅंड कॅनयन, ग्रेट बॅरीयर रीफ, ग्वानबारा बे, पॅरीक्युटीन ज्वालामुखी (मेक्सिको), विक्टोरिया फॉल्स व औरोरा ही सात नैसर्गिक आश्चर्ये.
पण ह्या सर्वापेक्षा अधिक विस्मयचकीत करणारं असं एक आश्चर्य आहे ज्याबद्दल गेल्या वीस एक वर्षातच चर्चा सुरू आहे आणि ती पण शास्त्रज्ञ व संशोधनसंस्था ह्यांच्याच वर्तुळात. ही चर्चा अजून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेली नाही. काय आहे त्यांच्या चर्चेचा विषय ? आणि हे आश्चर्य मानवनिर्मित की नैसर्गिक ?
आपणा सर्वाना माहीत आहे की पृथ्वीवर जी ३०% जमीन आहे ती एकूण सात खंडात विभागलेली आहे - आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप व ऑस्ट्रेलिया. (क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी ते सर्वात लहान).
पण पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जो ७०% भाग महासागरांनी वेढलेला आहे, त्यात बरीच गुपितं लपलेली आहेत.
असेच एक गुपित आहे झीलॅंडीया Zelandia नावाच्या भूभागाचे जो जवळपास ९४% प्रशांत महासागराच्या पोटात दडलेला आहे. मात्र काही भूगर्भशास्त्रज्ञ व संस्था हा भूभाग पृथ्वीवरील आठवा खंड म्हणून घोषित केला जावा म्हणून प्रयत्न करीत आहेत. नक्की काय आहे ह्या Zealandia ची कहाणी ?
साधारण ८३० लाख वर्षांपूर्वी गोंडवाना ह्या (सध्याचे साऊथ अमेरिका, आफ्रिका, अरेबिया, मादागास्कर बेटे, भारत, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका यांचा एकत्रित महाखंड) महाखंडापासून Zelandia/Tasmantis वेगळा झाला होता. (चित्र १)
अंटार्क्टिका व ऑस्ट्रेलिया ह्यांच्यामध्ये असलेला हा ५० लाख वर्ग किमी क्षेत्रफळाचा भूभाग साधारण २५० लाख वर्षांपूर्वी प्रशांत महासागरात पूर्णपणे बुडाला. आधुनिक काळात १९९५ साली सर्वप्रथम Bruce Luyendyk ने ह्या भूभागाचे बारसे करून त्यास Zelandia / Tasmantis हे नाव दिले व हा आठवा खंड म्हणून घोषित करण्याची संकल्पना जगापुढे आणली. त्यानंतर अगदी नजीकच्या भूतकाळात GNS Science ह्या न्यूझीलंडमधील संशोधनसंस्थेने न्यू कॅलीडोनिया व ऑस्ट्रेलियातील काही संस्थांबरोबर काम करून ह्या मागणीचा पुनरूच्चार केला की ज्यानुसार न्यूझीलंड, न्यू कॅलिडोनिया, नॉरफोक बेटे, लॉर्ड होवे द्वीपसमूह व एलिझाबेथ आणि मिडलटन रीफ ह्यानी बनलेल्या व बाकी ९४% भाग समुद्राखाली असलेल्या ह्या भूभागास खंड घोषित करावे. डॉ. निक मॉर्टीमर ह्या संशोधनात प्रमुख शास्त्रज्ञ होते. त्यांच्या म्हणण्यानुसार Zelandia एक खंड म्हणून घोषित केला जाण्यास, भूगर्भीय कवच, क्षेत्रफळ, तेथे वर्तमानात वा भूतकाळात असलेली जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती अशा विविध निकषांवर पात्र ठरतो.
या निमित्ताने ह्या संशोधनगटाने दोन नकाशे प्रसिद्ध केले आहेत. (चित्र २)
या गटाच्या मते न्यूझीलंड व न्यू कॅलीडोनिया हे ह्या भूखंडाचे दोन मुख्य भाग आहेत जे समुद्राच्या वर दृष्यमान झाले आहेत. ह्या शिवाय Zelandia चा Ball's Pyramid हा एकच भाग असा आहे जो समुद्राच्या वर दिसतो. (चित्र ३)
केलेल्या संशोधनानुसार व त्यातील निरीक्षणां नुसार हा भूखंड ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या ते दोन तृतीयांश आकाराचा असून प्रशांत महासागरीय भूविवर्ती तल समुद्राच्या पाण्याखाली जाण्यामुळे ९४% Zelandia आज पाण्याखाली असला तरी एकेकाळी त्यावरील सदाहरित जंगलांमध्ये (rain forests) दिनासूर (Dinosaurs) नांदत होते ज्यांचे जीवाश्म आजही त्याचा पुरावा आहेत.
समुद्राच्या पाण्याखाली असलेल्या ह्या भूखंडाच्या क्षेत्रात आजही मत्स्यशेती मोठ्या प्रमाणावर होते कारण मासे तेथे विपुल प्रमाणात आढळतात. ह्या शिवाय भूगर्भ वायूचे साठे (न्यूझीलंडचे Maui Gas Basin) देखील ह्या क्षेत्रात आढळून येतात.
तर अशी ही Zelandia ची अद्भुत भूमी. तिला आठवा खंड म्हणून सर्वमान्यता मिळते का ह्याचं उत्तर येणारा काळच देइल.
पण दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो की जो प्रश्न लेखाच्या शीर्षकात ही आहे आणि तो म्हणजे हे आश्चर्य नैसर्गिक की मानवनिर्मित ?
आता तुम्ही म्हणाल की साहजिकच नैसर्गिक. कारण हा खंड काही मानवाने बनवलेला नाही. बरोबर. पण मानवाने तो शोधला तर आहे. इतर नैसर्गिक आश्चर्यांप्रमाणे समोर दिसत नसताना, विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांच्या मदतीने मनुष्याने, निसर्गाचे हे गुपीत उघड केले आहे आणि त्यामुळे जर झीलॅंडीयाला आठव्या खंडाचा दर्जा मिळाला तर त्या आश्चर्यात अफाट, अगाध निसर्गाच्या सिंहाच्या वाट्याबरोबरच, मानवाच्या जिज्ञासू वृत्तीचा व बुद्धीचा देखील खारीचा वाटा आहे.
-- मनिष मोहिले

No comments:
Post a Comment